राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या उपक्रमांची समाजाला गरज : बी.आर.पाटील [पोलीस भरती सराव चाचणी परीक्षा बक्षीस वितरण समारंभ] 

करवीर  : 

ग्रामीण भागातील युवकांना  स्पर्धा परीक्षेचे  मार्गदर्शन होणे, त्यांचा सराव योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. ही गरज ओळखून राजू सूर्यवंशी फौंडेशनने पोलीस भरती सराव चाचणी हा उपयुक्त असा उपक्रम हाती घेतला. अशा सराव चाचणीतूनच ग्रामीण भागातील युवकांचा प्रशासकीय सेवेतील प्रमाण वाढेल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त उपअधीक्षक बी.आर.पाटील यांनी केले. 

      कसबा बीड ता. करवीर येथे कल्लेश्वर हायस्कुलच्या प्रांगणात माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली  राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या वतीने आयोजित पोलीस भरती सराव चाचणी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आयोजक राजेंद्र सूर्यवंशी यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून  शुभेच्छा दिल्या. 

सराव चाचणी परीक्षेत ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता   यामध्ये पहिल्या ५ विजेत्यांना ट्रॉफी, रोख रक्कम, टी शर्ट तसेच गुणानुक्रमे  पहिल्या  ७० विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले. 

यावेळी टी.एल.पाटील, शामराव सूर्यवंशी, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, यशवंत बँकेचे संचालक जयसिंग सूर्यवंशी, उत्तम पाटील, जगदीश पाटील, उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय गावडे, सरदार जोगडे, भगवान जाधव, योगेश कुंभार, विजय मांगोरे, मुख्याध्यापक पवार सर, यांच्यासह, शिक्षक,   विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!