शिरोली दुमाला येथे गायीने दिला जुळ्या वासरांना जन्म

कोल्हापूर :

शिरोली दुमाला ता. करवीर येथे एक आगळावेगळा आणि आनंददायी प्रसंग घडला असून येथील शेतकरी संजय मारुती चौगले यांच्या गायीने जुळ्या वासरांना जन्म दिला आहे. गायीने जुळ्या वासरांना जन्म देणे ही तुलनेने दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण असून गावातील नागरिकही वासरांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

संजय चौगले हे शाहू छत्रपती दूध संस्थेचे दूध उत्पादक असून त्यांचा जनावरांचा मोठा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यात ७ गायी, ३ म्हैशी व ४ रेडी आहेत. यापैकी एका गाईने कोणत्याही अडचणीशिवाय दोन निरोगी वासरांना जन्म दिला.

दोन्ही वासरे मादी आहेत. त्यांचा रंग काळा पांढरा आहे. सदरची गाय ही दुसऱ्या वेताची असून गोकुळ दूध संघाच्या वासरू संगोपन योजनेच्या लाभास पात्र ठरली आहे. गाय आणि दोन्ही वासरे सुखरूप असल्याचे चौगले कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

Share
error: Content is protected !!