पाडळी खुर्द मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार  : राजेंद्र सूर्यवंशी (कोगे प्रचार सभेमध्ये घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करण्याचे  आवाहन ) 

कोल्हापूर : 

 गेली अनेक वर्षे  सर्वसामान्यासाठी काम करत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक असून जनता मला नक्कीच साथ देणार. जनसेवेसाठी रात्रंदिवस कष्ट करेन. लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणे हेच कर्तव्य मानले. पाडळी खुर्द मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी मला साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी – भाजपाचे  जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले. 

कोगे (ता. करवीर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप पक्षाची जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. सभेच्या  अध्यक्षस्थानी  प्रकाश सखाराम पाटील हे होते. 

यावेळी बोलताना  राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, पैशाच्या जीवावर बोलणारा मी माणूस नसून माणसे जोडणारा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये विशेष करून कोरोनावेळी, जनावरे लंपी आजाराने ग्रस्त झाले असताना,महापुरावेळी पुरग्रस्तासाठी केलेली कार्ये, अपघात प्रसंगी व संकटकाळी दिवस-रात्र न पाहता सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालो आहे. 

प्रत्येक गावामध्ये  गाव तिथे क्रीडांगण होण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. 

यशवंत बँकेचे संचालक प्रा. टी. एल. पाटील म्हणाले,   चांगले कार्य करणाऱ्याच्या पाठीशी राहणे  काळाची गरज आहे. त्यामुळे भूलथापांना व आमिषांना बळी न पडू नका.  जिथे प्रश्न तिथे राजेंद्र सूर्यवंशी हजर असतो. अशा उमेदवाराच्या पाठीशी राहा. 

 इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, स्व. एन डी पाटील यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठे करा हा दिलेला उपदेश मानून केवळ राजेंद्र सूर्यवंशी यांना विजयी करा हे आवाहन करण्यासाठी आलो आहे.  राजेंद्र सूर्यवंशी यांनी नदीवरील पाणी  उपसा बंदी, प्रीपेड मीटर, शेतीची पाणीपट्टी अशा विविध आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा करून दिला आहे. अशा लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या बाजूने राहा व निवडून आणावे, असे आवाहन केले 

यावेळी भाजपचे दादासो दसाई, भाजपा सरचिटणीस सुशीलाताई पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी प्रा. बाजीराव पाटील, कृष्णात पाटील, बळीराम चव्हाण, जी. डी. पाटील पाडळी खुर्द, आनंदा रामा पाटील कोगे, विश्वजीत पाटील कसबा बीड, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक पाटील,प्रास्ताविक उत्तम पाटील, तर आभार प्रा. बाजीराव पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!