वडिलांच्या उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देत शाळांना आर्थिक मदत : सावर्डे दुमालातील कारंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

करवीर :

सावर्डे दुमाला (ता.करवीर ) येथील एस.आर. कारंडे व आनंदा कारंडे या बंधूनी वडील रघुनाथ भिवा कारंडे यांच्या निधनानंतर उत्तरकार्याच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळत शाळांना आर्थिक मदत दिली. यनिमित्ताने कारंडे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.

कै. रघुनाथ कारंडे यांचा उत्तरकार्य कार्यक्रम साधेपणाने पार पाडण्यात आला. पारंपरिक जेवणावळी व इतर खर्चिक प्रथांना फाटा देत कुटुंबीयांनी ती रक्कम गावातील माध्यमिक विद्यालय सावर्डे – सडोली दुमाला शाळेस ३० हजार, जिल्हा परिषदेची विद्या मंदिर सावर्डे दुमाला शाळेस १५ हजार, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला १० हजार याप्रमाणे आर्थिक मदत देऊन शैक्षणिक कार्याला बळ दिले आहे.

माध्यमिक शाळेत दहावीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कारंडे परिवाराकडून दिलेल्या आर्थिक मदतीच्या व्याजातून बक्षीस दिले जाणार आहे. कारंडे परिवाराच्या या निर्णयाचे ग्रामस्थ तसेच शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.पी. पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक के. वाय. सरनाईक, माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कारंडे परिवार, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!