शाश्वत विकास, पर्यटनवाढ व रोजगारनिर्मिती चालना देणार : शिवसेना उमेदवार सचिन विश्वासराव पाटील ( पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ )
कोल्हापूर :
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच लोकप्रतिनिधीचे प्रमुख कर्तव्य असते. या दृष्टीने पाडळी खुर्द जिल्हा परिषद शिवसेना उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांनी मांडलेले विकासात्मक धोरण हे व्यापक, दूरदृष्टीपूर्ण आणि लोककेंद्री आहे. त्यांच्या धोरणात शेती, शिक्षण, आरोग्य, महिला-युवक सक्षमीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राचीन व ऐतिहासिक मंदिर पर्यटनाच्या विकासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
आपल्या विकासाच्या अजेंड्याबद्दल सचिन पाटील म्हणतात, विकासात्मक धोरणाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. रस्ते, गटर्स याशिवाय पाणीसाठा वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, तसेच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार . यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ग्रामीण भागात समृद्धी येईल, असा विश्वास आहे.
शिक्षण क्षेत्रात, ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळांची गुणवत्ता वाढवणे, डिजिटल शिक्षण सुविधा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचा संकल्प आहे. ग्रामीण खेळाडूंना उभारी देण्यासाठी मैदान निर्मितीला बळ देणार आहे.
आरोग्य सेवांच्या बाबतीत, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करणे, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, माता-बाल आरोग्य योजना, तसेच स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहिमा राबवणे यावर विशेष लक्ष असेल. निरोगी समाजाशिवाय शाश्वत विकास शक्य नाही.
मतदारसंघातील कसबा बीड श्री महादेव मंदिर, आरे येथील श्री हरिहरेश्वर मंदिर, सातेरी – महादेव मंदिर, वाशी येथील श्री बिरदेव मंदिर ही प्राचीन मंदिरे, धार्मिक स्थळे व ऐतिहासिक वारसा जतन करून त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा मानस आहे. रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, माहिती फलक आदी सुविधा उपलब्ध करून दिल्यास भाविक व पर्यटकांची संख्या वाढेल. यामुळे स्थानिक युवकांना मार्गदर्शक, वाहतूक, हॉटेल व्यवसाय, हस्तकला व पूरक उद्योगांतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
महिला व युवक सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, बचत गटांना आर्थिक पाठबळ, तसेच कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. सर्वच गावांना भेडसावणारा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर भरीव काम करायचे आहे. पर्यावरणसमृद्ध परिसराला प्राधान्य असणार.
पावसाळ्यात पुरामुळे कसबा बीड – महे पूल, बाचणी, आरे बंधाऱ्यावर येणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते. शेतीचे मोठे नुकसान होते. या प्रश्नावर काय काय पर्याय शोधता येईल याचा साकल्याने विचार असणार आहे. लोकसहभागातून विकास साधत, सांस्कृतिक वारसा जपून आर्थिक प्रगती घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या सर्वांच्या साथीने हा विकासाचा संकल्प पूर्ण करायचा आहे. धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा आणि विकासाची व सेवेची संधी द्यावी, असे विनम्र आवाहन.
