सचिन पाटील यांच्या विजयाचा ग्रामस्थांचा एल्गार ( शिरोली दुमाला प्रचार फेरी ) 

कोल्हापूर :

पाडळी खुर्द जिल्हा जिल्हा परिषदेचे  उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सचिन पाटील यांच्या विजयी घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला. 

प्रचार फेरीदरम्यान शिरोली दुमालातील नागरिक, युवक  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचार फेरीच्या निमित्ताने गाव एकवटला होता. यावेळी सर्वांनी सचिन पाटील यांच्या विजयाचा एल्गार केला. 

गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले, गेली ४० वर्षे आबाजी सहकार, राजकारणात आहेत. नरके घराण्याच्या चौथ्या पिढीबरोबर ते काम करत आहेत. सचिन पाटील हे रयत संघाचे चेअरमन आहेत. शिरोली दुमाला गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत. प्रचंड जनधार असलेले हे युवा नेतृत्व आहे.  विकासाची गंगा आणूया. कोण काय म्हणते तिकडे लक्ष देऊ नका शिरोली दुमालाचा स्वाभिमान जपूया. सर्वाधिक मताधिक्य गावातून देऊया. 

उमेदवार सचिन पाटील म्हणाले, शिरोली दुमालासह संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहीन. आबाजींचे कार्य जिल्ह्याला माहिती आहे. आमचे मताधिक्य विरोधकांना धडकी भरवणारे असणार. 

यावेळी गावकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत आबाजी व सचिन पाटील यांच्या  आतापर्यंतच्या कार्याचा अभिमान असल्याचे सांगत या निवडणुकीत सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रचार फेरीत गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी), कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, एस. के. पाटील, माधव पाटील, सुभाष पाटील, रंगराव पाटील, कुंभी बँकेचे संचालक दत्तात्रय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते. सर्वांचा  वाढता उत्साह पाहता शिरोली दुमाला परिसरात सचिन पाटील यांची विजयी घोडदौड सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. स्वागत वीरशैव बँकेचे माजी संचालक अनिल सोलापुरे यांनी तर आभार सरदार पाटील यांनी मानले. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!