डॉ. के. एन. पाटील निवडून येणार हे निश्चित : आम. सतेज पाटील ( काँग्रेसच्या कोगे येथील जाहीर सभेला मोठी गर्दी )
कोल्हापूर :
कोगे गावातील रस्ता करणे, वारकऱ्यांसाठी जमिन देण्याचे डॉ. के. एन. पाटील यांचे धाडस नजरेत भरणारे आहे. निवडणुकीआधीच सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता पहिल्यांदाच पाहतोय. पुढच्या पाच वर्षातील कामे आधीच पूर्ण करत आहे. जनतेसाठी त्यांनी सर्वस्व दिले आहे. त्याच विश्वासाने कोगे व मतदारसंघातील जनता त्यांचे मागे राहील. कोगे येथील गर्दी व पाठिंबा पाहता डॉ. के. एन. पाटीलच निवडून येणार हे निश्चित आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोगे ता. करवीर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार डॉ. के. एन. पाटील व वाशी पं.स.उमेदवार तुषार पुजारी यांच्या जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग डाफळे मामा होते. सभेला ग्रामस्थ, महिला व युवकांची मोठी गर्दी होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत डॉ.के.एन.पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ शिवाजी चौक, मॉब बॉईज ग्रुप, वारकरी संप्रदाय मंडळ, महिला भजनी मंडळ यांनी जाहीर पाठिंबा दिला. सर्वांनी डॉ. के. एन. यांच्या विजयाचा निर्धार केला.
आम. सतेज पाटील म्हणाले, भाजप – सेना सरकारने महागाईचा कळस गाठला आहे. स्मार्ट मीटर बसवून जनतेला लुबाडण्याचा डाव आहे. शक्तिपीठ मार्गाचे भूत आता करवीरच्या शेतकऱ्यांवर लादले जाणार आहे. वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊया आणि भाजप – शिवसेना सरकारला झटका देऊया. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम बंटी पाटील करत आहे. त्यात कुठेही कमी पडणार नाही. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून आणूया.
जि. प. उमेदवार डॉ. के.एन. पाटील म्हणाले, कोगेतील वारकऱ्यांसाठी तीन गुंठे जागा , रस्ता (१५ लाख ), सडोली दुमाला महादेव मंदिर जीर्णोद्धार ( 30 लाख ), सावरवाडी येथे (२० लाख ), पाडळी खुर्द येथे महापुरात पडझड घरांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी १० हजार प्रमाणे स्वखर्चातून ( २ लाख) अशी अनेक कामे स्वतः करत आहे. मी निधी आणल्यावरच विरोधकांना निधीची घोषणा का करावी लागत आहे. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. त्यामुळे विकासाच्या बळावर कोगे आणि माझे नाते दृढ झाले आहे. सभेला ग्रामस्थांची झालेली गर्दी पाहता कोगे ग्रामस्थ मला विजयाचा गुलाल लावणार हे निश्चित.
यावेळी वाशी पं. स. उमेदवार तुषार पुजारी यांचे मनोगत झाले. यावेळी तंटामुक्त सदस्य सर्जेराव घराळ, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, किरण पाटील,महिला फाउंडेशनच्या सरिता सासणे,धनंजय खाडे,संभाजी पाटील,डी.आर. बुडके,बाळासाहेब पाटील, सर्जेराव घराळ, संदीप पाटील, श्रीकांत पाटील, जयसिंग पाटील, सुभाष पालकर, दिनकर पाटील यासह संतोष फ्रेंड्स सर्कलचे सर्व कार्यकर्ते, कोगेतील तरुण मंडळे, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
