गडकोट – किल्ले प्रतिकृती प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग : कल्लेश्वर हायस्कूलचा उपक्रम, ३५ प्रतिकृतींचे प्रदर्शन 

कोल्हापूर :

कसबा बीड (ता. करवीर ) येथील कल्लेश्वर हायस्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या गडकोट –  किल्ले प्रतिकृती प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध गडकोटांच्या ३५ प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होत्या . संस्थेचे सचिव आर.बी.पाटील, मुख्याध्यापक एन.एम.पवार, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम.पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. प्रदर्शनास  माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील यांनी खास  भेट देऊन पाहणी केली.

प्रदर्शनामध्ये लहान व मोठा असे ३५ गट सहभागी झाले होते. प्रत्येक गटाने  जंजिरा, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, अजिंक्यतारा, सिंधुदुर्ग, विशाळगड, सिंहगड, तोरणा आदी किल्यांच्या नाविन्यपूर्ण प्रतिकृती साकारल्या होत्या. यातून विद्यार्थ्यानी गडकोट स्वच्छता व संवर्धनाचाही संदेश दिला.  दोन्ही गटातून प्रत्येकी तीन विजेते क्रमांक काढण्यात आले. या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Share
error: Content is protected !!