कोगे गावात अंतर्गत रस्ते, तलावासह सर्व कामे पूर्ण करणार : आम. चंद्रदीप नरके ( सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ कोगे येथे जाहीर सभा )

कोल्हापूर :

विरोधी उमेदवाराने पाच वर्षात पंचायत समितीतून काय काम केले सांगावे असा सवाल करत आम्ही गप्पागोष्टीपेक्षा विकासाला महत्त्व देतो. कोगे गावाला आतापर्यंत ७५ लाखाचा निधी दिला आहे. संपूर्ण गाव काँक्रीटीकरण करणार आहे. कोगे तलाव सुशोभीकरणाचे काम लवकरच सूरू होईल. कोगे गावाला लागेल तेवढा निधी देणार. कोगे गावातील सर्व कामे पूर्ण करणार, असे प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.

कोगे ता. करवीर येथे पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील, पाडळी खुर्द पंचायत समिती उमेदवार अमित आप्पासो हजारे यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव पाटील होते.

बुद्धीराज पाटील म्हणाले, गोड बोलून मते लाटणारा आमचा उमेदवार नाही. आजचा युवक जागा आहे. विरोधकांना विकासाबाबत जाब विचारा. प्रलोभनाला बळी पडू नका.

जि. प. उमेदवार सचिन पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास केला आहे. कचरा व्यवस्थापन प्रश्न मार्गी लावला. विकासाचे व्हिजन घेऊन पुढे जाणार आहे. विरोध कांनी लोकांशी नुसते गोड बोलून दिवस काढले. कोगे गावात त्यांनी रुपयाचा विकास केला नाही. जिल्हा परिषदेत भारा उचलायला नव्हे तर विकास करायला जायचे आहे, हे विरोधी उमेदवार विसरले असल्याची टिका केली.

याप्रसंगी पृथ्वीराज सूर्यवंशी, एस.डी.जरग यांचे भाषण झाले. सभेला गोकुळचे संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, कुंभी कारखाना संचालक भगवान पाटील, विश्वास पाटील, उत्तम वरुटे, किशोर पाटील, दादासो लाड, सरदार पाटील, आनंदराव पाटील, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, रंगराव पाटील, सरपंच वंदना इंगवले, कृष्णात फडतारे, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते . स्वागत वैभव गुरव व प्रास्ताविक के.डी.पाटील यांनी केले. आभार बाबासो पाटील यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!