राजेंद्र सूर्यवंशी हा जनमाणसांच्या मनातला उमेदवार : जगदीश पाटील महेकर व उत्तम पाटील कोगेकर यांचे साथ देण्याचे आवाहन
कोल्हापूर :
पाडळी खुर्द जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक चेहरे दिसत असले तरी एक नाव मात्र सामान्य माणसाच्या ओठांवर आपसूक येत आहे ते म्हणजे राजेंद्र सूर्यवंशी. कारण ते केवळ उमेदवार नाहीत, तर ते जनतेच्या दुःख–सुखात सहभागी होणारे आपलेच माणूस आहेत, अशा शब्दात जगदीश पाटील महेकर व उत्तम पाटील कोगेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी (भाऊ ) तसेच पंचायत समितीचे मोहन पाटील व आनंदा शिरोलीकर यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत जगदीश पाटील व उत्तम पाटील पुढे म्हणाले, राजेंद्र सूर्यवंशी यांचा राजकारणाचा प्रवास कुठल्याही आलिशान व्यासपीठावरून सुरू झालेला नाही. स्व. आमदार पी. एन. पाटील साहेब व माजी आमदार संपतबापू यांच्या मार्गदर्शनाखाली तो अथक सामाजिक सेवेतून, गरिबांचा आधारवड बनून मदतीला उभे राहून निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल पाटील भैया यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे कार्य करत आहेत. ” सत्ता नव्हे, सेवा” हा मंत्र त्यांनी कृतीतून जपला आहे.
आजही कुणाच्या घरात आजारपण असेल, घरकुलची अडचण असेल, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांवर संकट आले असेल, तर पहिला फोन राजेंद्र सूर्यवंशी यांनाच जातो. कारण मदतीसाठी त्यांनी कधी वेळ, कधी ओळख पाहिली नाही. त्यामुळे गावागावांतून एकच भावना ऐकायला मिळते – “हा आमचा माणूस आहे. हा आमच्यासाठी उभा राहणारा आहे.”
राजकारणात आश्वासनांची गर्दी असते, पण राजेंद्र सूर्यवंशी यांची ओळख कामातून तयार झाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे फक्त सत्तेची लढाई नाही, ती जनतेच्या भविष्याची निवड आहे. आणि म्हणूनच आज राजेंद्र सूर्यवंशी हे नाव फक्त मतपत्रिकेवर नाही, तर जनमाणसाच्या मनात कोरलं गेलं आहे.
