स्व. जनाबाई नारायण पाटील यांच्या १०० व्या जन्मदिन : विश्वासराव पाटील(आबाजी )परिवारातर्फे बालकल्याण संकुल येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोल्हापूर :
गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील( आबाजी ) व तुकाराम पाटील यांच्या मातोश्री स्व. जनाबाई नारायण पाटील यांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील पाटील परिवारातर्फे कोल्हापूर येथील बालकल्याण संकुल येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तांदूळ, साखर, फळे आदी साहित्याचे वितरण करून गरजू मुलांना मदतीचा हात देण्यात आला.
स्व. जनाबाई पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त व स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अमर पाटील, लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील सुनील पाटील, राहुल पाटील, उर्मिला पाटील, राजश्री पाटील, प्राजक्ता पाटील, बंदिनी पाटील, सारिका पाटील, स्वप्नाली मोहिते, श्रुती गायकवाड, धीरज पाटील, पार्थ पाटील, राजवीर पाटील, रणवीर पाटील, शौर्य पाटील तसेच बाल कल्याण संकुलातील प्रतिनिधी उपस्थित होते.
