गावच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे : अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे ( पाडळी खुर्द येथे आजी – माजी सैनिक सेवा फाऊंडेशनचे उद्घाटन )
कोल्हापूर :
गावाच्या विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. गावागावांमध्ये प्रत्येक कुटुंबात व घरात प्रॉपर्टी व अहंकारातून वाद निर्माण होत आहेत. हे अंतर्गत वाद मिटविणे महत्वाचे आहे. गावच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.
पाडळी खुर्द ( ता. करवीर) येथील आजी- माजी सैनिकांच्या हितासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी आजी-माजी सैनिक सेवा फाऊंडेशनच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कर्नल बी.के.कल्लोळी,
करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या हस्ते उदघाट्न सोहळा पार पडला.
यावेळी भाजपा ग्रामीण पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष डॉ . के एन पाटील म्हणाले, पाडळी खुर्द गावामध्ये वाचनालय व ग्राउंडची आवश्यकता आहे. .समाजकारणातून राजकारण करताना पाडळी खुर्द गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगून पाडळी खुर्द गावातील कोणताही घटक विकासापासून वंचित राहणार नाही याची मी काळजी घेईन असे म्हणाले .
करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी खेळातून, वाचनातून निर्माण होणारी पिढी सुसंस्कृत असते .यासाठी मुलांनी रात्रीच्या मित्रांच्या पेक्षा सकाळी ग्राउंडवरील मित्रांची निवड करून आपले करिअर सांभाळावे. उचित ध्येय बाळगून मेहनत घेणारे विद्यार्थी चांगले बनतात असे सांगितले.
मान्यवरांचा सत्कार लेफ्टनंट शिवाजी मर्दाने,आनंदराव पाटील, भाजपा ग्रामीण पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष डॉ.के. एन.पाटील, सरपंच तानाजी पालकर,नरसिंह समूहाचे जे.डी. पाटील, गजानन सहकार समूहाचे सुरेशराव सूर्यवंशी, सुभेदार रावसाहेब नाटकुळे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुभेदार रावसाहेब नाटकुळे,समीर खानोलकर,श्रीकांत मगदूम,शिवाजी मर्दाने,आदींचा सन्मान करण्यात आला. कर्नल बी. के कल्लोळी,शिवाजी मर्दाने,आदींची मनोगते झाली.
यावेळी सुभेदार रावसाहेब नाटकुळे,तंटामुक्त अध्यक्ष सिताराम पाटील,पंचायत समिती माजी सदस्य मोहन पाटील, पोलीस पाटील सविता सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम पाटील, प्रास्ताविक व स्वागत विश्वजीत पाटील तर आभार माजी लेफ्टनंट शिवाजी मर्दाने यांनी मानले.
