कोगे गावाला विकासाची गती देणार : डॉ. के. एन.पाटील ( कोगे येथील घराळ गल्लीतील रस्त्याचे उदघाट्न)

कोल्हापूर :
ग्रामीण भागातील गावांतर्गत दळणवळण सोई सुखकर होणे गरजेचे आहे. पोकळ प्रलोभने दाखवून गावातील रस्त्याचा विकास खुंटला गेला. कोगेतील घराळ गल्लीतील रस्ता केल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय टळली आहे. स्वनिधीतून संतोष फ़्रेंड सर्कलच्या पुढाकारातून रस्ता पूर्ण झाल्यामुळे अनेकजण खडबडून जागे झालेत आहेत. पण खऱ्या अर्थाने आपण विकासाचा मार्ग लोकसहभातून खुला केला आहे. कोगे गावाला विकासाची गती देणार असल्याचा विश्वास डॉ. के. एन.पाटील यांनी दिला.

कोगे, ता. करवीर येथील घराळ गल्लीतील रस्ता डॉ. के. एन. पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. त्याच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिलांसाठी कुंकूमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मोठ्या भक्तिमय वातावरणात शेकडो महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णात फडतारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष उमाजी इंगवले, पांडुरंग डाफळे अर्जुन हारुगले, तुषार पुजारी वाशी, संतोष फ्रेंड्स सर्कल कोगेचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. संभाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार दत्तात्रय मोरे यांनी मानले.

Share
error: Content is protected !!