करवीरमधील युवक – युवतींनी उज्ज्वल यश संपादन करावे : राहुल पाटील सडोलीकर [ राजू सूर्यवंशी फौंडेशनच्या पोलिस भरती सराव चाचणी परीक्षेत ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग ]

करवीर : 

स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक  पुढे जात आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात कष्टही घेत आहेत. यामध्ये युवतींची संख्याही वाढत आहे. राजू सूर्यवंशी फौंडेशनने  स्तुत्य उपक्रम राबविला आहे, त्याचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. करवीरमधील युवक – युवतींनी उज्ज्वल यश संपादन करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी केले. 

कसबा बीड (ता. करवीर) येथील राजू सूर्यवंशी करियर फौंडेशन आयोजित पोलिस भरती सराव चाचणी परीक्षेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कल्लेश्वर हायस्कूलच्या मैदानावर ही परीक्षा झाली. यामध्ये  ५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विजेत्यांना पहिल्या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,  रोख रक्कम व टी शर्ट देऊन गौरव करण्यात आला. तसेच पहिल्या ७० विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले. 

यावेळी  आयोजक माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले  स्व.आ. पी. एन.पाटील व संपतबापू पाटील यांचा सामाजिक कार्याचा वसा  घेऊन हा उपक्रम घेतला आहे. गावागावातील क्रिडांगणाबरोबर लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ही परीक्षा उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. 

गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, माजी सभापती पांडुरंग पाटील, शामराव सूर्यवंशी,  प्रकाश मुगडे, प्रकाश मुगडे, बाजीराव पाटील , आनंदा पाटील, दत्ता मुळीक, रवींद्र पाटील,सर्जेराव सूर्यवंशी, माजी सरपंच शिरोलीच्या माजी सरपंच  रेखा मच्छिन्द्र कांबळे, श्रीनिवास पाटील आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी,  भागातील विविध मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. 

Share
error: Content is protected !!