कोल्हापूर:

भोगावती सहकारी साखर कारखाना (परिते ता. करवीर) सन २०२५-२६ सालाची विक्रमी एफ.आर.पी. जाहीर केली आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याने प्रतिटन ३ हजार ६५३ इतकी विक्रमी एफ.आर.पी.जाहीर केली असून हा दर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अव्वल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी दिली. यावेळी व्हाचेअरमन राजाराम कवडे आणि कार्यकारी संचालक सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विक्रमी ऊस दराच्या घोषणेनंतर उद्या शुक्रवारपासून (दि. ७) पासून कारखान्याचा चालू करत असल्याचेही चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे आणि कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जनरल मॅनेजर संजय पाटील, कारखान्याचे संचालक डी. आय. पाटील, केरबा पाटील, मारुतीराव जाधव, रघुनाथ जाधव, शिवाजी कारंडे, अविनाश पाटील, अक्षय पवार आदी संचालकासह शेती अधिकारी साताप्पा चरापले, कामगार प्रतिनिधी शिवाजी डोंगळे यांचेसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Share

By kupe

error: Content is protected !!