Tim Global :

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला आहे. शेतपिकांच्या नुकसानाकरिता एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी ही मदत तातडीने बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घावी, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती, काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं . यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व सदस्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती, आणी शेतकऱ्याशी संवाद साधला होता.

पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता मदतीमचं वाटप, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ३६५ कोटी ६७ लाख इतका निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास विभागीय आयुक्तांमार्फत मंजुरी देण्यात आली आहे,आणि तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं वाटप विभागांनुसार पुढीलप्रमाणे ….. पुणे विभाग १५० कोटी १२ लाख रुपये, कोकण विभाग ८ कोटी ५१ लाख रुपये, अमरावती विभाग ११८ कोटी ४१ लाख रुपये, नाशिक विभाग १ लाख रुपये, औरंगाबाद विभाग ७७ कोटी ९७ लाख रुपये, नागपूर विभाग १० कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३६५ कोटी ६७ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

Share
error: Content is protected !!