(पुणे शिक्षक मतदारसंघ): माढा तालुक्यातून डॉ. बी. पी. रोंगेंना वाढता पाठिंबा : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका; विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी


टेंभुर्णी : शिक्षकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हीच प्रभावी नेतृत्वाची ओळख असल्याचे अधोरेखित होत आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार डॉ. बी. पी. रोंगे यांना माढा तालुक्यातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

विविध शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांचा पदोन्नतीनंतर आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. रोंगे यांच्या प्रशासकीय प्रक्रियेचा अभ्यास, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या कार्यपद्धतीमुळे शिक्षकवर्गात त्यांच्या कामाची चर्चा होत आहे.याच पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांच्या पत्नी, स्वेरीच्या विश्वस्त व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष सौ. प्रेमलता रोंगे यांनी माढा तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला.

यामध्ये मारुतीराव हरीराव महाडिक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, मोडनिंब; संजीवनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब; वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल, मोडनिंब; उमा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब; संगनबसवेश्वर शिवयोगी कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, मोडनिंब; नंदीकेश्वर हायस्कूल, उपळाई; महाराणी ताराराणी कन्या प्रशाला, उपळाई; मदर पब्लिक स्कूल, माढा; महात्मा फुले विद्यालय, वरवडे; न्यू इंग्लिश स्कूल, आढेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल, टाकळी अशा विविध संस्थांचा समावेश होता.


या भेटीदरम्यान संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांशी संवाद साधण्यात आला. शिक्षकांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण विचार करून योग्य प्रशासकीय मार्गाने ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची डॉ. रोंगे यांची भूमिका सौ. प्रेमलता रोंगे यांनी विशद केली.


महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य के. बी. होडगर यांनी डॉ. रोंगे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांच्या पुढाकारामुळे प्रश्न मार्गी लागत असल्याने आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.


पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याच्या उपक्रमामुळे डॉ. रोंगे यांच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे.

Share

You missed

error: Content is protected !!