सांगोला तालुक्यात डॉ. बी. पी. रोंगेंना वाढता प्रतिसाद :
(शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण पाठपुरावा करण्याची ग्वाही; शाळा-महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी)


सांगोला : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तथा ‘ज्ञानयात्री’ डॉ. बी. पी. रोंगे यांनी सांगोला तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षकांशी थेट संवाद साधला. या भेटींना शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संस्थेचे संस्थापक व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी गेल्या दीड वर्षापासून पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि समस्यांचा सखोल अभ्यास यांच्या बळावर त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.


सांगोला तालुक्यात फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, शिवाजी पॉलिटेक्निक, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला महाविद्यालय यांसह विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांनीही तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या.


यावेळी बोलताना डॉ. रोंगे म्हणाले, शिक्षकांसमोर टीईटी, जुनी पेन्शन योजना यांसह अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. हे प्रश्न शासनदरबारी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिक्षकांनी संधी दिल्यास जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.


शिक्षकांशी सातत्यपूर्ण संवाद, समस्यांचा प्रत्यक्ष अभ्यास आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव यामुळे डॉ. रोंगे यांच्या उमेदवारीकडे शिक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. सांगोला तालुक्यातील वाढता प्रतिसाद त्यांच्या प्रचारासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

Share

You missed

error: Content is protected !!