कोल्हापूर :

डॉ. के. एन. पाटील यांच्याकडे सडोली दुमाला ता. करवीर येथील ग्रामस्थांनी श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा असलेला प्रसंग तसेच ग्रामस्थ, महिला, युवक या सर्वांच्या धार्मिक भावना ओळखून डॉ. के. एन. पाटील यांनी पदरमोड करून १० लाख रुपये स्वखर्चातून दिले. श्री महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम डॉ. के. एन.पाटील यांच्यामुळे सुरू होत असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.

सडोली दुमाला ता. करवीर गावातील श्री महादेव मंदिर गेली कित्येक वर्षे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होते.. मात्र डॉ. के. एन. पाटील यांच्या या दातृत्वातून मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला प्रारंभ झाला आहे. डॉ. पाटील यांनी १० लाख रुपये दिल्यामुळे मोडकळीस आलेले जुने मंदिर ग्रामस्थांनी पाडून डॉ. पाटील यांच्या हस्ते पायापूजन विधी मोठ्या उत्साहात पार पाडला होता .

याप्रसंगी डॉ. के. एन.पाटील यांनी मंदिराच्या पूर्णत्वासाठी लागणारी पुढची २० लाखाची तरतूदही करून देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोणतीही सत्ता, पद हातात नसताना डॉ. पाटील यांनी दाखवलेले धाडस आणि औदार्य पाहून ग्रामस्थांनी त्यांना मनोमन आशीर्वाद दिले. तसेच उपस्थित ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीत गावाचा आस्थेचा विषय जो कित्येक वर्षे दुर्लक्षित होता तो पूर्ण केल्याबद्दल डॉ. के. एन. पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Share

By kupe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!