करवीरमधून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणू : आमदार चंद्रदीप नरके ( कसबा बीड येथे सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा )
कोल्हापूर :
करवीर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणला आहे. लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी आहे, जनता आपल्या सोबत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही २४ तास कार्यरत असतो. या आमच्या कामाला गती देण्यासाठी पं सं. व जि. प. वर आमचे सदस्य असणे गरजेचे आहे. पं. स. व जि. प. निवडणुकीत करवीरमधून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणू, असे प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कसबा बीड येथे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पाडळी खुर्द गजानन सहकार समूहाचे प्रमुख सुरेशराव सूर्यवंशी होते. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके यांनी पाडळी खुर्द जिल्हा परिषद उमेदवार सचिन पाटील, शिरोली दुमाला पं. स. उमेदवार नामदेव खांडेकर, पाडळी खुर्द पं. स. उमेदवार अमित हजारे यांची ओळख करून दिली.
यावेळी आम. चंद्रदीप नरके म्हणाले, सचिन पाटील यांना आबाजींचा वारसा आहे. विकासाचे व्हिजन घेऊन सचिन पाटील कार्यरत आहेत. पं. स. चे दोन्ही उमेदवार उमदे आहेत. येणाऱ्या काळात ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करूया.
जिल्हा परिषद उमेदवार सचिन पाटील म्हणाले, ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम करताना निधी कसा वर कोठून आणावा याचा अनुभव पाठीशी आहे. मतदार संघात पायाभूत सुविधेसह महिला सक्षमीकरण, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, रोजगार उपलब्धी यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले.
सभेचे अध्यक्ष सुरेशराव सूर्यवंशी यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आबाजींचा प्रवेश झाल्यापासून शिवसेनेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.
यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील ( आबाजी ), राजवीर नरके, बुद्धीराज नरके, पृथ्वीराज सूर्यवंशी यांची मनोगते झाली. आनंदराव पाटील, कुंभी कारखान्याचे संचालक भगवान रामा पाटील, उत्तमराव पाटील, किशोर पाटील, विश्वास दत्तात्रय पाटील, सर्जेराव हुजरे, दादासो लाड, सरदार पाटील, अमित वरुटे, शैलेंद्र वरुटे, पंडित वरुटे, रंगराव पाटील, रणजित पाटील, सुधाताई पाटील आदीसह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
