कोल्हापूर :

पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे शिवसेना उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांचा आरे (ता. करवीर ) गावात प्रचार दौरा झाला. दौऱ्यात उमेदवार सचिन पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

दौऱ्यात मतदारांशी भेट देत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गती वाढविण्यासाठी, पाडळी खुर्द मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी साथ द्या, असे आवाहन सचिन पाटील यांनी केले.

यावेळी प्रचार दौऱ्यात महेश बाजीराव पाटील, रमेश बाजीराव पाटील, सुरेश ज्ञानदेव चौगले, एकनाथ गुरव, दिंगबर वरुटे, बबन सदाशिव चौगले, तुषार चौगले, राज वरुटे, शिवाजी आगळे, अभिजित वरुटे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Share

By kupe

error: Content is protected !!