( पाडळी खुर्द जिल्हा परिषद): शिरोली दुमालात सचिन पाटील यांची प्रचार फेरी : निवडून देण्याचे आवाहन
कोल्हापूर :
शिरोली दुमाला (ता. करवीर ) येथे पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील(भैया )यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.
श्री हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचार फेरीस सुरुवात झाली. गावातील प्रमुखा मार्गावरून ही प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी गल्लीबोळ दणाणून गेले. मातंग वसाहतीमध्ये प्रचार फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना सचिन पाटील यांनी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती दिली आहे. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढे भरीव काम करायचे आहे. आपण आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले.
प्रचार फेरीत गोकुळचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील ( आबाजी ) , कुंभी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, अनिल सोलापुरे, सुभाष पाटील,
उपसरपंच कृष्णात पाटील, माधव पाटील, एस. के. पाटील, राहुल पाटील, सुशांत पाटील, शिवाजी पाटील , एकनाथ पाटील, अशोक पाटील, डी. वाय. पाटील, रंगराव पाटील, श्रीकांत पाटील, सरदान पाटील, तानाजी पाटील, शिवार्ज काईगडे, संजय गडकर, मोहन कांबळे, रमेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
