लाडक्या अजितदादांच्या अस्थीकलश दर्शनाने कोल्हापूरकर भावुक 

कोल्हापूर : 

महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार  उपमुख्यमंत्री नाम. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थी  मार्केट यार्ड येथील  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील मंडपात 

ठेवण्यात आली. आज सोमवारी कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात  अस्थिकलश दर्शनासाठी  सकाळ पासून  सर्वपक्षीयांनी उपस्थिती लावली. आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या आठवणीने अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला. 

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी नऊ वाजता अस्थीकलश घेवून कोल्हापुरात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थीकलश स्वीकारून स्व. अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत फुले वाहून प्रतिमेचे पूजन केले.

राज्याचे  मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, राहुल पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मानसिंगरावदादा गायकवाड, डॉ. नंदाताई बाभुळकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी उपमहापौर महेश सावंत, माजी उपमहापौर सुनील पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ. जयंत प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांच पदाधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, चाहते आदींनी दर्शन घेतले. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!