महेत शिवसेना उमेदवार सचिन पाटील यांची दणकेबाज प्रचारफेरी 

कोल्हापूर : 

पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन विश्वासराव पाटील ( भैया ) व शिरोली दुमाला पंचायत समिती मतदारसंघाचे अधिकृत उम्मेदवार नामदेव शंकर खांडेकर यांची महे गावात दणकेबाज प्रचारफेरी काढण्यात आली. या  प्रचारफेरीत शिवसेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 गावातील महादेव मंदिर येथून प्रचार फेरीला  करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन पाटील ( भैया) घरोघरी भेटी देत माता भगिनीं, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, युवक यांच्याशी  थेट संवाद साधत निवडून देण्याचे आवाहन केले. 

यावेळी युवा नेते राजवीर नरके, हनुमान दूध संस्था चेअरमन बुद्धीराज पाटील, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव हुजरे, माजी सरपंच पंडित पाटील, सचिन पाटील, निखिल हुजरे, अंकुश जरग, संभाजी पाटील, बाबुराव पाटील, अजित कांबळे, संदीप पाटील, अनिल पाटील, सरदार कांबळे, सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share
error: Content is protected !!