शिक्षक असणारा माणूसच  आमदार करायचा : मानद सचिव सुधीर पटवर्धन ( डॉ. बी. पी. रोंगेंनी साधला पंढरपूर तालुक्यातील शिक्षकांशी संवाद)

पंढरपूर : शिक्षणावर, संस्थेवर प्रेम करणारा माणूस आपल्याला भेटला आहे. जिथे अडचण तिथे मदत करणे हा ज्ञानयात्री डॉ. बी. पी. रोंगे सरांचा मूळ स्वभाव आहे. त्यांच्याकडून आपण त्यांचे हात धरून काम करून घेऊ शिक्षक असणारा माणूसच  आमदार करायचा, असा मनोदय  पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुधीर पटवर्धन यांनी व्यक्त केला. 

अपक्ष उमेदवार डॉ. बी.पी. रोंगे हे पुणे विभाग शिक्षक  निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी मागील जवळपास दीड वर्षापासून संवाद साधत आहेत. याच अनुषंगाने डॉ. रोंगे सर हे पंढरपूर शहर व तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील शिक्षकांच्या भेटीच्या निमित्ताने संवाद साधला. या भेटींच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र जल्लोषाने स्वागत करण्यात येत होते. 

             मानद सचिव पटवर्धन पुढे म्हणाले की, ‘डॉ. रोंगे सरांना दर महिन्याला शाळेत बोलावून प्रश्न मांडू, तो प्रश्न कधी सुटणार याचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तक्ता तयार करू. नियोजित पद्धतीने कार्य करून घेवू.अशा पद्धतीने आपण सरांसोबत काम करू. घरातला जवळचा माणूस म्हणून आपण त्यांना शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेत पाठवू. 

             भेटीप्रसंगी शिस्त, नियोजन, परिश्रम व त्यातून मिळालेले यश’ म्हणजे डॉ. बी. पी. रोंगे सर होय. शिक्षकांसाठी तळमळ असणारा व्यक्ती आपणांस आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवायचा आहे. अशी भावना  शिक्षकांनी  व्यक्त केली. 

——————————————————

पंढरपूर तालुक्यातील ११० शाळांना भेटी : 

             पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पंढरपूर, कवठेकर प्रशाला पंढरपूर, अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर, दत्त विद्यामंदिर सुस्ते, एस.के.एन. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज कोर्टी, न्यू सातारा शिक्षण संकुल कोर्टी, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, एसपी प्रोग्रेस पब्लिक स्कूल नांदोरे, ज्ञानदीप पब्लिक स्कूल नांदोरे, दौलतराव विद्यालय कासेगाव, विवेक वर्धिनी पंढरपूर, रेणुका विद्यालय बाभूळगाव, न्यू इंग्लिश स्कूल रोपळे, गगनगिरी विद्यालय सांगवी, किशोर निर्मळ पब्लिक स्कूल तारापूर, यशवंत विद्यालय पंढरपूर यांच्यासह इतर ११० पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालयांना डॉ. रोंगे यांनी भेटी दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षकांनी समस्या व अडचणी व्यक्त केल्या. ‘हे प्रश्न कसे सुटतील यासाठी मी कटिबद्ध आहे.’ अशी ग्वाही डॉ. बी. पी. रोंगे यांनी शिक्षकांना  दिली.

————————————————–

Share

You missed

error: Content is protected !!