गोकुळमध्ये कपबशी विरुद्ध शिट्टी! : छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला कपबशी, तर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिट्टी चिन्ह
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी (महायुती) आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवार निश्चितीनंतर चिन्हही मिळाले आहे. महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला कपबशी, तर आम. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
दोन्ही आघाड्यांना निवडणूक चिन्हे निश्चित झाल्याने गोकुळमधील निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे. आता या चिन्हांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रचाराचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये होणाऱ्या लढतीकडे दूध उत्पादक सभासदांचे लक्ष लागले आहे. निवडणूक चिन्हे निश्चित झाल्यानंतर प्रचाराला कोणते स्वरूप येते आणि कौल कोणाच्या बाजूने जातो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
