शिरोली दुमाला  – हिरवडे दुमाला दरम्यान आढळला बिबट्या 

करवीर : 

आज  रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास करवीरच्या पश्चिम भागातील शिरोली दुमाला ते हिरवडे दुमाला दरम्यान असणाऱ्या शिवरस्त्यावर  बिबट्या  आढळून आला. त्यामुळे शेतकऱ्यांसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील तेजस शहाजी पाटील हे सोयाबीन ची मळणी करून शेतातील घरात ठेवण्यासाठी निघाले असता त्यांच्या ट्रॅक्टर च्या समोरून बिबटया बाचणी गावाच्या दिशेने गेला. वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांनी  शेतात जाताना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. 

Share

You missed

error: Content is protected !!