सचिन  विश्वासराव पाटील यांचा कसबा बीड येथे प्रचार शुभारंभ जल्लोषात : कार्यकर्त्यांची मोठी गर्दी 

कोल्हापूर : 

शिवसेनेचे पाडळी खुर्द जिल्हा परिषदचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील,  पाडळी खुर्द पंचायत समिती उमेदवार अमित आप्पासो हजारे आणि शिरोली दुमाला  पंचायत समिती  उमेदवार नामदेव खांडेकर यांचा प्रचार शुभारंभ कसबा बीड येथील श्री महादेव मंदिरातून करण्यात आला. 

करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी ) आदींच्या प्रमुख उपस्थितीत  व  कार्यकर्त्यांच्या गर्दीत हा शुभारंभ जल्लोषात करण्यात आला.

यावेळी राजवीर नरके, गजानन समूहाचे सुरेशराव सूर्यवंशी, बुद्धीराज पाटील, पृथ्वीराज सूर्यवंशी, करवीर तालुका  शिवसेना गटाच्या महिला अध्यक्ष सुधाताई पाटील,  कुंभी  साखर कारखाना तज्ञ संचालक भगवान रामा पाटील, आनंदराव पाटील, विद्यमान संचालक विश्वास दत्तात्रय पाटील, सरदार पाटील,  किशोर पाटील, उत्तमराव वरुटे, दादासो लाड, सर्जेराव हुजरे,  कुंभी बँकेचे संचालक रणजीत पाटील, पंडित वरुटे, रंगराव पाटील, शैलेंद्र वरुटे, पांडुरंग विकास संस्थेचे चेअरमन अमित वरुटे, यासह पाडळी खुर्द मतदारसंघातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share
error: Content is protected !!