माढा तालुक्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना शिक्षकांचा मोठा प्रतिसाद (पत्नी प्रेमलता रोंगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या शाळा-महाविद्यालयांना भेटी; शिक्षकांच्या प्रश्नांच्या पाठपुराव्याची चर्चा) 

कुर्डुवाडी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार ज्ञानयात्री प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांना माढा तालुक्यातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यावर रोंगे यांनी भर दिला असून, त्यांच्या पत्नी प्रेमलता रोंगे यांच्यासह कार्यकर्तेही प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत.

डॉ. रोंगे यांनी गेल्या वर्षभरापासून पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका असल्याने विविध ठिकाणी त्यांच्या भेटींचे स्वागत होत आहे.

माढा तालुक्यात नुकत्याच झालेल्या दौऱ्यात सुमारे २५ शाळा-महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला. प्रेमलता रोंगे यांनी कुर्डुवाडी, बारलोणी, कव्हे, रोपळे, भोगेवाडी, वडशिंगे, म्हैसगाव आणि रिधोरे परिसरातील शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शैक्षणिक अडचणी आणि सेवाविषयक प्रश्न जाणून घेण्यात आले. अर्जुन खटके, भारत माने यांच्यासह समर्थक उपस्थित होते.

स्वेरी, एसव्हीआयटी आणि स्वाईप या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून डॉ. रोंगे यांनी केलेल्या कामाचा अनुभव शिक्षकांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हीच प्रचारातील प्रमुख भूमिका असल्याचे त्यांच्या भेटींमधून अधोरेखित होत आहे.

Share

You missed

error: Content is protected !!