शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगावकर यांना उमेदवारी

कोल्हापूर :


महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापू लागले असून
काँग्रेसकडून विद्यमान आमदार प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीनंतर २ ऑक्टोबर रोजी पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रा. आसगावकर हे २०२० मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

Share

By kupe

You missed

error: Content is protected !!