अडचणीच्या काळात धावून येणाऱ्या राजेंद्र सूर्यवंशी यांना साथ द्या : खास. धनंजय महाडिक ( वाशी येथील जाहीर सभेला प्रचंड गर्दी )
कोल्हापूर :
सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून त्यांच्या हाकेला धावणारा, काम करणारा राजू सूर्यवंशी जिल्हा परिषदेवर जायलाच हवा. अडचणीच्या काळात सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या राजेंद्र सूर्यवंशी यांना साथ द्या, असे आवाहन खास. धनंजय महाडिक यांनी केले.
वाशी ता. करवीर येथे राष्ट्रवादीचे पाडळी खुर्द जि.प. उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी व पं.स. उमेदवार मोहन पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब मोहिते होते. सभेला प्रचंड गर्दी होती.
राहुल पाटील म्हणाले, . विरोधकांचे स्व. साहेबांवरील प्रेम पुतणा – मावशीचे आहे. राजेंद्र सूर्यवंशी हे स्व.पी. एन.साहेबांच्या व संपत बापूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. स्व. साहेबांचा चेहरा व स्व.अजितदादांची आठवण ठेवून राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना मताधिक्य देऊया. आपला विजय निश्चित आहे.
इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, ज्या ज्या वेळी वीज, पाणी प्रश्न असेल त्या त्या वेळी राजूभाऊ रस्त्यावर आले. महापुरात ट्रान्सफॉर्मर मिळवून देणे, उपसा बंदी हटविण्यासाठी ३ दिवस आंदोलन करण्यात राजूभाऊच पुढे होते. अगदी रात्रीसुद्धा शेतकऱ्यांसाठी धावत येणारे हे उमदे नेतृत्व आहे. त्यांना निवडून द्या.
उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी यांनी महापुरात, कोरोना काळात जीवाची पर्वा न करत रात्रंदिवस लोकसेवेचे काम केले आहे. जनता मला मताच्या रूपात नक्कीच आशीर्वाद देईल. जनसेवेसाठी आयुष्य वाहीन, अशी भावनिक साद घातली.
भोगावती संचालक बी.ए. पाटील, भीमराव पाटील, संतोष रानगे यांची भाषणे झाली. यावेळी भोगावतीचे चेअरमन शिवाजी पाटील, दिंगबर मेडसिंगे, राजाराम कारखाना संचालक मीनाक्षी पाटील, संतराम पाटील, अनिल कांबळे, एम. एस. पाटील, रघुनाथ पाटील, सरदार रानगे, सत्यजित पाटील, संतोष पोर्लेकर, आश्विनी धोत्रे, जे. डी. पाटील, चेतन पाटील, रेखा म. कांबळे, गजानन सुभेदार, दादा देसाई, उत्तम पाटील, जगदीश पाटील आदीसह राष्ट्रवादी, भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
