राजेंद्र सूर्यवंशी हाडाचा कार्यकर्ता : मंत्री हसन मुश्रीफ ( राजेंद्र सूर्यवंशी, आनंदा शिरोलीकर व मोहन पाटील यांना विजयी करण्याचे शिरोली दुमाला येथील जाहीर सभेत आवाहन)
कोल्हापूर :
राजेंद्र सूर्यवंशी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. ग्रामीण विकासाची नस आणि नस त्यांना माहीत आहे. सामान्य माणसांसाठी त्यांनी कष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध लढले आहेत. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र
सूर्यवंशी, पाडळी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार मोहन पाटील, शिरोली दुमाला पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार अशोक कांबळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणे हीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी, पाडळी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार मोहन पाटील, शिरोली दुमाला पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार आनंदा शिरोलीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनानंतर आम्ही सर्वांनी
एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. असे असताना आमचे विरोधक आपल्या निवेदन आणि फलकांवर के. पी. एन. पाटीलसाहेब यांचे फोटो वापरत आहेत. त्यांना कळून चुकलय की, त्यांचा फोटो लावल्याशिवाय आपल्याला मतेच मिळणार नाहीत. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना विजय करूया.
यावेळी भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, नारायण पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील, चेतन पाटील व बाजीराव पाटील, सत्यजित पाटील, मच्छिद्र कांबळे, गजानन सुभेदार, संतोष पोर्लेकर, दादासाहेब देसाई, विश्वजित पाटील, पांडुरंग पाटील, संजय शिपुगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
