knpatil

डॉ. के.एन. पाटील यांच्या प्रचारार्थ पाडळी खुर्द येथील पदयात्रेस मोठा प्रतिसाद 

करवीर : 

पाडळी खुर्द जिल्हा परिषदेचे राष्ट्रीय काँग्रेसचे  इच्छुक उमेदवार डॉ. के.एन. पाटील यांच्या प्रचारार्थ पाडळी खुर्द ता. करवीर  येथील पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस समर्थकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी डॉ. के.एन. पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. 

यावेळी डॉ. के. एन. पाटील म्हणाले, गावातील  सामाजिक कार्याला नेहमीच पाठबळ दिले. गावाशी नाळ घट्ट असल्यामुळे गाव भक्कमपणे पाठीशी याचा पूर्ण विश्वास आहे. गावाबरोबरच पाडळी जिल्हा परिषद मतदार संघात कोणतेही पद नसताना केलेली विकासकामे, सामाजिक कामे या जोरावर नक्की विजयी होणार. सर्वांनी ताकदीने प्रचाराला लागावे असे आवाहनही केले. 

यावेळी वाशी पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी व शिरोली दुमाला पंचायत समितीचे उमेदवार हिंदुराव कांबळे, सरपंच तानाजी पालकर,  तंटामुक्त अध्यक्ष सिताराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, बबन रानगे वाशी, पै.  शिवाजी पाटील, ग्रामपंचायत  सदस्य कांचन पाटील, माधुरी पाटील, सही सोहनी, किरण सूर्यवंशी सरकार, आनंद पाटील, संभाजी आडनाइक, दिलीप पाटील, पैलवान अनिल पाटील नंदवाळ, शिवाजी पाटील चेअरमन गजानन संस्था, आनंदा कांबळे, बबन कांबळे संदीप कांबळे, अवधूत पाटील,  सुभाष पालकर,  दिलीप बानुगडे, वस्ताद बाळासो पाटील, वस्ताद शामराव तिबिले वाशी,  सचिन पाटील माजी सरपंच वाशी,  अनिल पाटील नंदवाळ,  चेअरमन आकाराम सूर्यवंशी पांडुरंग खोत पिरवाडी, मंगल पाटील, डी. के.सावरवाडी याबरोबर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.  

Share
error: Content is protected !!