सावरवाडी येथे दिवंगत आमदार पी. एन.पाटील यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त ७३ नारळ झाडांचे वृक्षारोपण : आबा कावतोय ग्रुपच्या वतीने  भैरवनाथ देवस्थानच्या क्रिडांगणाभोवती वृक्षारोपण 

कोल्हापूर : 

सावरवाडी ( ता. करवीर ) येथील विवेकानंद सांस्कृतिक मंडळ, प्रणित आबा कावतोय ग्रुपच्या वतीने दिवंगत आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त  ७३ नारळ झाडांचे येथील भैरवनाथ देवस्थानच्या क्रिडांगणाभोवती वृक्षारोपण करण्यात आले. युवा नेते  माजी जि. प. अध्यक्ष राहुल पी. पाटील  सडोलीकर  यांच्या हस्ते शुभहस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी हिंदुराव कंदले होते.

   यावेळी बोलताना राहूल पी.  पाटील सडोलीकर म्हणाले,  स्व. आम.  पी. एन. पाटील यांचे सावरवाडी गावशी घरगुती नाते होते. सावरवाडी गावचा दत्त जयंती प्रसाद त्यांनी कधीही चुकवला नाही. 

साहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम व आपलेपणा दिला. साहेबांच्या आचारविचारावर  पाऊल ठेवून येणाऱ्या काळात सर्वांना काम करायचे आहे. 

गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, स्व. साहेबांचे  व्यतिमत्व हे जरी आक्रमक वाटत असले तरी त्यांचे मन प्रेमाने  भरलेले होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा हा उपक्रम घेतल्याबद्दल आबा कावतोय ग्रुपचे आभारी आहोत. 

माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, सावरवाडी गावाने लोकसहभागातून हे क्रिडांगण तयार केले आहे. नारळ रोपणद्वारे आर्थिक स्तोत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. साहेबांची आठवण म्हणून  ही सर्व झाडे जगवूया,  असे आवाहन केले. 

 साईप्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार मुख्याध्यापक शिवाजी लाड यांनी केले.

यावेळी भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, संचालक बी. ए.पाटील, राजेंद्र आडके,  पृथ्वीराज सूर्यवंशी, संतोष पोर्लेकर,  सत्यजित पाटील, सज्जन पाटील, चेतन पाटील, प्रकाश मुगडे, दत्तात्रय मुळीक, बाजीराव पाटील, बी. एस. नलवडे, श्रीपतराव दिवसे,  बाबासाहेब जाधव, बाबुराव जाधव, केरबा जाधव यांच्यासह पंडितराव खोपकर हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक  ग्रामस्थ उपस्थित होते. 

Share
error: Content is protected !!