कोगेतील प्राथमिक  शाळेला डॉ. के. एन. पाटील यांच्याकडून दोन तिजोरी भेट

कोल्हापूर : 

सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे पाडळी खुर्द (ता. करवीर) गावचे उद्योजक डॉ. के. एन. पाटील यांनी कोगे येथील प्राथमिक शाळेची गरज ओळखून कुमार व कन्या शाळेला दोन तिजोरी भेट दिल्या. यावेळी मुलांना  खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेमध्ये अनेक कागदपत्रे व रेकॉर्ड ठेवण्यासाठी तिजोरीची गरज होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डॉ. पाटील हे शाळेच्या भेटीला आले होते. त्यावेळी शाळेसाठी लागणाऱ्या तिजोरीची मागणी करण्यात आली होती. त्यांनी तत्काळ मागणीची पूर्तता केली. 

याप्रसंगी डॉ. के. एन. पाटील म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  याचे भान ठेवून सामाजिक कार्य करीत असतो. 

 शाळेतील कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सोय झाल्यामुळे शिक्षक समाधानी होते. शाळेस तिजोरी मिळाल्यामुळे डॉ. पाटील यांचे शाळेतर्फे आभार मानले. याप्रसंगी कुमार व कन्या शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, सर्व अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!