डॉ. के.एन. पाटील  यांना  जिल्हा परिषदेवर पाठवा : आमदार सतेज पाटील ( वाशी येथील प्रचार सभेत काँग्रेसच्या  उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ) 

कोल्हापूर : 

        राष्ट्रीय काँग्रेस पक्षामार्फत पाडळी खुर्द मतदारसंघातून प्रथम काम करून मते मागणारा  उमेदवार डॉ.के.एन.पाटील हे आहेत. त्यांना जिल्हा परिषदेवर पाठवा. जनता हीच माझी ताकद असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला भरभरून साथ दिली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीसाठी उभारलेल्या उमेदवारांना निवडून द्या, असे  आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले .

         वाशी  (ता.करवीर ) येथे काँग्रेसचे  पाडळी खुर्द जिल्हा  परिषद उमेदवार डॉ. के. एन.पाटील, पाडळी खुर्द पंचायत समिती उमेदवार तुषार पुजारी व शिरोली दुमाला पंचायत समिती उमेदवार हिंदुराव कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

     यावेळी काँग्रेसचे  जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉ. के. एन. पाटील म्हणाले, कोगे येथे रस्ता करून दिला . सिद्धिविनायक मंदिर येथे शेड उभारणी तयार करून देण्याचे काम सुरु केले आहे .सावरवाडी येथे स्वनिधीतून वीस लाखाचा निधी दिलेला आहे.सडोली दुमाला येथे महादेव मंदिर बांधण्यासाठी शुभारंभ केलेला आहे.खेळाडू घडले पाहिजेत यासाठी त्यांना लागणारे साहित्य व स्पर्धा आयोजन करून देशाचे नाव उज्वल करण्यासाठी नेहमीच युवा पिढीच्या बरोबर राही.  यासाठी काँग्रेसच्या  उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. 

     वाशी गावचे बबनराव रानगे  यांनी जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहू असे सांगितले.

      यावेळी  गोकुळचे संचालक चेतन नरके , बाबासाहेब चौगले, उदयानीदेवी  साळोखे (वहिनी) यासह वाशी व परिसरातील  सर्व मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!