करवीरमधील  सर्व जागा निवडून आणूया : मंत्री हसन मुश्रीफ ( स्वयंभूवाडी येथे राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती  उमेदवारांचा  प्रचार शुभारंभ ) 

 करवीर : 

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार  म्हणजे होणार. तसेच राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल.  करवीरमधील  सर्व जागा निवडून आणूया, असे आवाहन  मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

 स्वयंभूवाडी ता. करवीर  येथील श्री स्वयंभू मंदिर परिसरात करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व  पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. 

यावेळी जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर म्हणाले, स्वर्गीय पी. एन. पाटील यांचे व या परिसरातील जनतेचे नाते दृढ आहे. या परिसरातील वाड्या वस्त्यांपासून गावागावांपर्यंत विकासामध्ये स्वर्गीय पी. एन. पाटील यांचे योगदान मोठे आहे. आपल्या उमेदवारांच्या मागे भक्कमपणे उभे राहून त्यांना विजयी करावे. 

 यावेळी सांगरुळ जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार रेखा प्रकाश मुगडे, सांगरूळ पंचायत समिती मतदार संघ उमेदवार मेघा आनंदराव नाळे व बहिरेश्वर पंचायत समिती मतदार संघ उमेदवार लता सूर्यकांत दिंडे यांची  भाषणे झाली.

 प्रचार शुभारंभास  केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शंकरराव पाटील, महेश पाटील, संतोष पोर्लेकर, शिवाजीराव देसाई, भाजपच्या सरचिटणीस सुशीला पाटील, कृष्णात चाबूक, सचिन पाटील, शामराव सूर्यवंशी, सुभाष सातपुते, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश मोरे, विलास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!