सडोली खालसा ग्रामस्थांनी जपले समाजभान : पंचगंगा स्मशानभूमीस ५ हजार शेणी दान

करवीर :

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्याच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. या दहनविधीसाठी शेणी अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी शेणी दानचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.

युवकांनी ग्रामपंचायत व सर्व तरुण मंडळे यांच्या सहकार्यातून गावातून ५ हजार शेणी जमा केल्या. त्या सर्व शेणी टेम्पो मधून युवकांनी पंचगंगा स्मशानभूमी येथे कोरोनाचे सर्वनियम पाळत दान केल्या. यावेळी पालिकेच्या वतीने त्यांना कृतज्ञता पत्रही देण्यात आले.

Share

You missed

error: Content is protected !!