करवीर :
श्री सद्गुरू शिक्षण संस्था संचलित महिला महाविद्यालय, कसबा बीड यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन (एनएसएस दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत कु. शिल्पा कांबळे हिने प्रथम, कु. मधुरा खोत हिने द्वितीय, तर कु. विराणी खांडेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री सद्गुरू शिक्षण संस्थेचे संचालक भगवान सूर्यवंशी, सचिव आर. बी. पाटील, कल्लेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. एम. पवार, कल्लेश्वर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. डी. के. भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. वाय. एस. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व तसेच एनएसएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे स्वागत सहा. प्रा. उमेश कांबळे यांनी केले. यावेळी प्र. प्राचार्या अमृता बाबर, प्रा. प्रियंका एकशिंगे, प्रा. एस. एस. घाटगे, प्रा. गीता सुतार, प्रा. अमृता यादव यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
