श्री फायर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नूतन वास्तूचे सोमवारी उदघाट्न : मंत्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर :
श्री फायर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नूतन वास्तूचे उदघाट्न समारंभ सोमवारी ( दि. ३ नोव्हेंबर ) वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या शुभेहस्ते व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
तरी या मंगल प्रसंगी आपण कंपनीच्या w69/2, गोकुळ शिरगांव एमआयडीसी, कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनीचे डायरेक्टर शिवाजी दिनकर आडनाईक व मॅनेजिंग डायरेक्टर गणेश शिवाजी आडनाईक यांनी केले आहे.
