करवीर :

माऊली सेवाभावी संस्था सावर्डे दुमाला यांच्या वतीने वतीने गर्जन ता. करवीर येथील गावातील एकनाथ आबा जगताप, बंडू बजाप्पा सावंत, एकनाथ पांडुरंग देसाई व गणपती संतू सावंत यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गर्जन व सावंतवाडी येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती पांडुरंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे सचिव बंडोपंत पाटील यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.

लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई म्हणाले, तुळशी खोऱ्यातील ज्येष्ठ मंडळींनी सुरू केलेली सामाजिक कार्याची चळवळ निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार काढले. तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, खजानीस बी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माऊली सेवाभावी संस्थेचे सदस्य दादू सुर्वे, पांडुरंग कोंडी पाटील, तुकाराम कुंभार आदिसह अंगणवाडी सेविका सुनंदा नाईक, लता कांबळे, गजानन भोसले, परसू सावंत, सचिन नाईक यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजश्री नाईक यांनी केले. आभार लता कांबळे यांनी मानले.

Share

By kupe

You missed

error: Content is protected !!