काँग्रेस विचाराच्या उमेदवारांना निवडून द्या : काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे आवाहन ( पाटेकरवाडी येथे युवराज यशवंत  पाटील  व सचिन मारुती पाटील यांच्या प्रचारार्थ सभा ) 

कोल्हापूर : 

स्व. आमदार पी. एन.पाटील साहेबांनी या भागात काँग्रेसचा विचार घराघरात नेला आहे. साहेबांबरोबर ३५–४० वर्षे  निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांसाठी हा काळ महत्वाचा आहे. महानगरपालिकेत काँग्रेसने उभारी घेतली तशी या निवडणुकीतही घेऊया. स्वर्गीय पी. एन. साहेबांच्या कार्याला खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस विचाराच्या  उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. 

 पाटेकरवाडी (ता. करवीर ) येथे काँग्रेसचे सडोली खालसा जिल्हा परिषदेचे उमेदवार  युवराज यशवंत  पाटील ( हिरवडे खालसा )  व हसूर दुमाला पंचायत समितीचे उमेदवार  सचिन मारुती पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. पाटेकरवाडी येथील सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात चैतन्य पसरले आहे. 

यावेळी आम. सतेज पाटील म्हणाले,  स्व. पी.एन. साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे कार्य केलेल्या करवीर पंचायत समितीचे माजी सभापती कै. मारुती पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा विकासाचा सक्षम वारसा पुढे  नेण्यासाठी पंचायत समितीवर  सचिन पाटील व युवराज पाटील यांना जिल्हा परिषदेवर पाठवूया.

सभेला एम. आर. पाटील, गोकुळचे माजी संचालक उदयराव पाटील, विद्यमान संचालक  बाबासाहेब चौगले, सुयोग वाडकर, बबनराव रानगे, डी.एम. पाटील, शौकत मुजावर, डी. आर. पाटील, भगवान पाटील, सरपंच सुनिता पाटील, सदाशिव पाटील, सारंग पाटील, नारायण पाटील, गणपती पाटील, गणपती कांबळे, विश्वास पाटील, संदीप पाटील, दिपक भोईटे, मोहसीन मुजावर, जयदीप पवार, बाबुराव पाटील, युवराज भोसले कांचनवाडी,युवराज भोसले सावर्डे, तानाजी भोसले ,विश्वास पाटील,अजित पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!