सचिन पाटील हे सर्वसमावेशक व सक्षम उमेदवार : आनंदराव पाटील ( सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ पाडळी खुर्द येथे पदयात्रा )

कोल्हापूर :

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सचिन पाटील हे जिल्हा परिषदेचे सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख उमेदवार असल्याचे प्रतिपादन कुंभी कारखान्याचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी केले. ते पाडळी खुर्द (ता.करवीर ) येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रा व सभेत बोलत होते.

आनंदराव पाटील म्हणाले, सचिन पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रशासन चालविले आहे. सहकारातील त्यांना अनुभव आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन, पारदर्शक व जबाबदार प्रशासन देण्याची क्षमता सचिन पाटील यांच्यात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ते योग्य आणि सर्वसमावेशक उमेदवार आहेत.

पदयात्रेत उमेदवार सचिन विश्वासराव पाटील यांनी
पाडळी खुर्द ग्रामस्थांचे आशीर्वाद घेऊन निवडून देण्याचे आवाहन केले.

यावेळी कुंभी कारखाना संचालक सरदार आनंदराव पाटील, जनसेवा दूध संस्थेचे चेअरमन भागवान पाटील, जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, भरत पाटील माणिक पाटील, यशवंत बँकेचे संचालक महेश पाटील, राजेंद्र पाटील, बी डी पाटील, गोविंद पाटील, दशरथ पाटील, कुंभी बँकेचे संचालक बाबुराव पाटील, जनसेवा पाणीपुरवठा चेअरमन किरण पाटील, उदय जाधव, विजय पाटील, जनसेवा दूध संस्थेचे संचालक बळवंत पाटील, जनसेवा पाणीपूरवठा संचालक भगवान पाटील यांचेसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!