उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विश्वास पाटील (आबाजी ) यांचा शिवसेना प्रवेश
कोल्हापूर :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील (आबाजी) यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे (मुंबई) येथील निवासस्थानी शनिवारी हा प्रवेश झाला
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, विश्वास पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या सहकारातील कार्याचा गौरव केला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके व इतर उपस्थित होते.
या प्रवेशावेळी सचिन विश्वास पाटील, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, बुद्धीराज पाटील, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष अनिल सोलापुरे, रयत संघाचे संचालक तसेच विविध सहकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
विश्वास पाटील( आबाजी) यांची ग्रामीण भागातील सहकारावर पकड आहे. पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी गोकुळचे संचालक , एस. आर. पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, संचालक किशोर पाटील, उत्तमराव वरुटे, संजय पाटील, पंडित हुजरे, पांडुरंग विकास संस्था कसबा बीडचे चेअरमन अमित वरुटे, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, माधव पाटील, एस. के. पाटील, पंडित वरुटे, पार्थ पाटील, राजवीर पाटील यांचेसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
