उपवडे ग्रामस्थांच्या कामाला गती देण्यात हातभार लावल्याचे समाधान : रुक्मिणी हेगिष्टे ( इनरव्हील क्लबकडून उपवडे ग्रामपंचायतीस सोलर पॅनलसाठी ५० हजार प्रदान )

कोल्हापूर :

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य हाती घेतले जाते. जनसामान्यांच्या गरजा पूर्ण कारण्यास प्राधान्य दिले जाते. सोलर वॅटद्वारे उपवडे ग्रामस्थांच्या कामाला गती देण्यात हातभार लावल्याचे समाधान लाभल्याचे मत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्ह्ज येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा चेअरमन उत्कर्षा पाटील या होत्या. याप्रसंगी सामाजिक योगदानात अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर ,च्या सौजन्याने
उपवडे ग्रामपंचायतीस सोलर पॅनलसाठी ५० हजाराचा चेक सरपंच पांडुरंग पोवार, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी वाडकर यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

जिल्हा चेअरमन उत्कर्षा पाटील म्हणाल्या उपवडे ग्रामपंचायत म्हणजे करवीर तालुक्यातील शेवटचं गाव. ग्रामस्थांची कागदपत्रासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन उपवडे ग्रामपंचायतीचे कामकामाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरने उचललेलं पाऊल सर्वांना दिशा देणारे आहे, असे गौरवोदगार काढले.

या प्रकल्पाचा फायदा उपवडेनजीक असलेल्या अनेक वाड्यावस्त्यांना होणार आहे. तसेच वीजपुरवठा अभावी ग्रामपंचायतीच्या कामकाजात होणारा अडथळा दूर होणार आहे. हा पर्यावरण पूरक प्रकल्प कार्यान्वित करण्यामध्ये क्लबच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणी हेगिष्टे , सचिव सौ. स्मिता घोसाळकर, संपादिका चारुता शिंदे, यांनी पुढाकार घेतला. या कार्यासाठी क्लबच्या सदस्या सौ. रजनी जाधव, माजी अध्यक्षा सौ. माणिक पाटील, सौ. बिना मोहिते, सौ.मनीषा संकपाळ आदींचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!