राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी सत्यजित पाटील 

कोल्हापूर :

गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व कसबा बीडचे माजी लोकनियुक्त सरपंच सत्यजित सुरेशराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील  यांचे निवडीसाठी विशेष सहकार्य लाभले.  यावेळी राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील,  शाहू काटकर, सुधीर देसाई व मान्यवर उपस्थित होते. 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!