कसबा बीड महिला महाविद्यालयात संविधान दिन साजरा
कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील महिला महाविद्यालय कसबा बीड, एन.एस.एस. विभाग यांच्या वतीने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य एन. एम. पाटील यांच्या हस्ते संविधानाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन कु. क्रांती पाटील विद्यार्थिनीने केले.
एन.एस.एस. विभाग प्रमुख सहा. प्रा.वाय. एस. पाटील यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थिनींना संविधान उद्देशपत्रिकेचे वाटप करण्यात आले. सहा. प्रा. सूरज तिबिले यांनी उत्कृष्ट फलकलेखन केले. स्वागत व सूत्रसंचालन सहा. प्रा. संचित कमलाकर यांनी तर आभार सहा. प्रा. उमेश कांबळे यांनी मानले.
यावेळी जिमखाना प्रमुख सहा. प्रा.एस.व्ही. कालेकर, सुरज तिबिले, रजनीकांत खांडेकर, मंजुषा काटाळे, अमृता बाबर, कोमल पाटील, तन्वी पाटील, प्रियांका एकशिंगे, शुभांगी सुतार, ग्रंथपाल प्रियांका कासोटे यासंह कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
