कोल्हापूर :
श्री. विश्वासराव नारायण पाटील फाउंडेशन, शिरोली दुमाला यांच्या वतीने महालक्ष्मी हॉल बीडशेड येथे आयोजित पाडळी खुर्द जिल्हा परिषद अंतर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत सुमारे ४० संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये राधे राधे, वाशी संघाने प्रथम, भैरवनाथ, सावरवाडी संघाने (द्वितीय) तर माऊली, कोगे संघाने तृतीय क्रमांक पटकविला.
कार्यक्रमास गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील ( आबाजी ) शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच
सचिन विश्वासराव पाटील, सौ.उर्मिला विश्वासराव पाटील,सौ. पल्लवी सचिन पाटील, सौ. बंदिनी राहुल पाटील तसेच हिरवडे दुमाला गावच्या सरपंच सौ. शालन गुंडाप्पा गुरव, कोगे गावच्या सरपंच सौ. वंदना उदय इंगवले, सावरवाडी गावच्या डे.सरपंच सौ. अश्विनी सागर कंदले, आरे गावच्या डे. सरपंच सौ. वैशाली दिगंबर वरुटे उपस्थित होते.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वासराव नारायण पाटील ( आबाजी )
यांनी चिरंजीव सचिन पाटील हे पाडळी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना आपण मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन केले.
लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाचा, विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत महिलांसाठी भरीव कार्य करायचे आहे. पाडळी जिल्हा परिषद मतदार संघात मी निवडणूक लढवू इच्छित असून तुमचे पाठबळ मला लाभावे आणि ते मला तुमच्याकडून लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला,
यावेळी सौ अश्विनी सागर कंदले यांनी महिलाप्रधान कार्यक्रम राबवून महिलांना व्यासपीठ मिळवून दिलेबद्दल आबाजींचे आभार मानले. पंच तनुजाराणी घाटगे, गीता उत्तूरकर, सरिता मादनाईक, क्रांती पाटील, संपदा थोरात, सविता पाटील, सुनिता कांबळे, मृण्मयी सातवेकर सर्व अधिकारी व सर्व स्वयंसेविका यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
झिम्मा स्पर्धा संघनिहाय निकाल :
राधे राधे, वाशी (प्रथम), भैरवनाथ, सावरवाडी (द्वितीय), माऊली, कोगे (तृतीय), रेणुका, सावरवाडी (चतुर्थ), समाधान, सावरवाडी ( पाचवा) हिरवडे हिरवडे दुमाला, ( उत्तेजनार्थ) गोकुळ गंगा, पिरवाडी (उत्तेजनार्थ ).
घागर घुमविणे स्पर्धा निकाल :
यशोदा खोत, सावरवाडी (प्रथम ), कविता यादव केतवाडी, (द्वितीय), कमल नलवडे, धोंडेवाडी ( तृतीय ).
फुगडी स्पर्धा निकाल :
कोमल खोत- शोभा खोत (प्रथम ), शितल माने – माया पाटील, महे (द्वितीय), रेश्मा इंगवले – पूजा पाटील, पाडळी (तृतीय), पूजा खांडेकर – अर्चना खांडेकर कसबा बीड, ( उत्तेजनार्थ), रेशमा कंदले – संगीता खोत, सावरवाडी (उत्तेजनार्थ).
सूप नाचविणे स्पर्धा निकाल :
कविता यादव, केतवाडी (प्रथम ), कमल नलवडे, धोंडेवाडी (द्वितीय), स्नेहल जाधव, वाशी (तृतीय), आम्रपाली माने, वाशी (उत्तेजनार्थ) संगीता सूर्यवंशी, वाशी( उत्तेजनार्थ ).
