महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना हत्तरगी गटाचा पाठिंबा 

कोल्हापूर : 

हत्तरगी गटाने कोल्हापूर येथे राजाराम कारखान्यात महाडिक कुटुंबीयांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी आम. महादेवराव महाडिक, खा. धनंजय महाडिक, माजी आम. अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अमेय हत्तरगी म्हणाले, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि कुटुंबीय यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार मंडलिक यांना पाठिंबा देत त्यांच्या विजयासाठी गडहिंग्लज तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे. तालुक्यातून एक एक मत गोळा करून मंडलिक यांना संसदेत पुन्हा पाठविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

गडहिंग्लज तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष वरदशंकर वर्दापगोळ, गंगाधर व्हस्कोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य मलगोंडा पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष महादेव साखरे, संकेश्वर कारखान्याचे संचालक उदय देसाई, माजी जिल्हा परिषद  सदस्य चंदू पाटील, नीळपणकर, सिद्धाप्पा कल्याणी (हेब्बाळ), अशोक स्वामी, अॅड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भूषण पाटील, ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!