गोकुळच्या नूतन संचालकांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

मुंबई :


कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) व नूतन संचालक मंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खास.शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्‍थानी भेट घेतली.

यावेळी दूध संघाच्या विविध विषयावर खासदार शरद पवार व संघाचे चेअरमन विश्‍वासराव नारायण पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यात चर्चा झाली.

यावेळी शरद पवार यांनी नव्या नेतृत्वाखाली गोकुळ आणखी बहरत जावो, गोकुळ अजून मला बहरलेला पहायचा आहे , त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नतीचे नवनवीन पाऊल गोकुळने टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी गोकुळच्या वाटचालीचे मनापासून कौतुक केले व संघाच्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गौरवोद्गार काढले. येथून पुढे संघास मार्गदर्शनाची गरज लागल्यास सर्वोत्‍परी मदत करु असे आश्‍वासन दिले.

यावेळी दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार व कृषी राज्‍यमंत्री डॉ. विश्‍वजीत पतंगराव कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण यांचीही सदीच्छा भेट घेतली.

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर ,मुंबई शाखेचे शाखाप्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.

Share
error: Content is protected !!